
no images were found
बीडमध्ये भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बीडः बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बीड भाजपचे शहराध्य भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. यासंदर्भात पोलीस चौकशी सुरु आहे.
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना ताबडतोब शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती मिळताच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या तात्काळ रुग्णालयात पोहोचल्या.
भगीरथ बियाणी यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, यामागे काही राजकीय किंवा कौटुंबिक कारण आहे का? याची चौकशी आता पोलीसांकडून सुरु आहे.