Home स्पोर्ट्स डी वाय पी कोल्हापूर रन मॅरेथॉनच्यामेडल, टी-शर्टचे आ.ऋतुराज पाटील यांच्याहस्ते अनावरन

डी वाय पी कोल्हापूर रन मॅरेथॉनच्यामेडल, टी-शर्टचे आ.ऋतुराज पाटील यांच्याहस्ते अनावरन

7 second read
0
0
29

no images were found

डी वाय पी कोल्हापूर रन मॅरेथॉनच्यामेडल, टी-शर्टचे आ.ऋतुराज पाटील यांच्याहस्ते अनावरन.                   कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : कोल्हापूरची मॅरेथॉन अशी ओळख असणाऱ्या ‘डी.वाय.पी. कोल्हापूर रन मॅरेथॉन’ मध्ये सहभागी स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या मेडल व टी शर्टचे अनावरण आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले.कोल्हापूरला फिट बनविण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी आमदार ऋतुराज पाटील यानी केले.
आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून रविवार दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी तपोवन मैदान येथून ही मॅरेथॉन सुरू होणार असून ऐतिहासिक रंकाळा तलावाभोवती धावण्याचा आनंद स्पर्धकांना घेता येणार आहे. शहर व उपनगरामधील नागरिकांसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे. प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त असणे गरजेचे असून त्यासाठी सर्व कोल्हापूरकरांनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.

रंकाळा मॉर्निंग वॉकर्सचे प्रा. एस. पी. चौगले, राजेंद्र पाटील, ज्येष्ठ मॅरेथॉनपटू श्री. चोपडे यांनी याप्रसंगी बोलताना कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याच्या रंकाळा परिसरात ही मॅरेथॉन आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, नंदकुमार सूर्यवंशी, इंद्रजित बोंद्रे, दुर्वास कदम तसेच दिलीप देसाई, दिग्विजय मगदूम, अमर सरनाईक, श्री. तंबाके, विजय सावंत, एसजेआर टायर्सचे श्री. निहाल जमादार, रग्गेडिअनचे आकाश कोरगावकर, चेतन चव्हाण, डॉ. प्रदीप पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डी.डी.पाटील यांच्यासह रंकाळा मॉर्निंग वॉकर्स ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…