
no images were found
तंबाखूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने केला आईचा खून
पुणे : अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय ६०) यांचा डोक्यात खोरे घालून त्यांच्या मुलाने अमोल बारकु खिल्लारी (वय 23) याने तंबाखुसाठी पैसे न दिल्याच्या कारणामुळे हत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
पुणे येथील शिरोली तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे ६० वर्षीय आईचा २३ वर्षीय मुलाने डोक्यात खोरे घालून खून केला. त्याने आईकडून तंबाखुसाठी पैसे मागितले होते. ते आईने न दिल्याच्या रागातून त्याने आईच्या डोक्यात फावड्याने घाव घातला. या हल्ल्यात अंजनाबाई या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या मुलास अटक केलेली आहे. पुढील तपास सुरु आहे.