Home शैक्षणिक ‘सिम्बा’ ॲनिमेशन पटाच्या निर्मिती प्रक्रियेची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती

‘सिम्बा’ ॲनिमेशन पटाच्या निर्मिती प्रक्रियेची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती

0 second read
0
0
39

no images were found

‘सिम्बा’ ॲनिमेशन पटाच्या निर्मिती प्रक्रियेची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती

कोल्हापूर : लहानांच्या आवडीचा ‘सिम्बा’ या ॲनिमेशन पटाची निर्मिती प्रक्रिया ते पडद्यावर अथवा टीव्हीवर ‘सिम्बा’ चे प्रसारण या सर्व टप्प्यांची माहिती आज शालेय विद्यार्थ्यांनी शाहू मिलमधील  शिबिरात घेतली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत आज इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स ॲनिमेशन स्टुडिओ’ज चे क्रिएटिव्ह प्रमुख भाऊसो पाटील यांचे ॲनिमेशन आणि कार्टुन फिल्म निर्मिती बाबत माहितीपूर्ण शिबिर घेण्यात आले.

भाऊसो पाटील म्हणाले, ॲनिमेशन म्हणजे चलचित्र आहे. 2 डी ऍनिमेशन (मूक) 1908 मध्ये तर आवाजासह पहिले 2 डी ॲनिमेशन 1928 मध्ये सुरु झाले. ॲनिमेशन बनण्याची प्रक्रिया, संकल्पना, संहिता लेखन, स्थळ निश्चिती, कॅरॅक्टर निवड, ऍनिमेशन अशा टप्प्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्टुन फिल्म निर्मितीत चित्रकलेचे महत्त्व त्यांनी विशद केले. शिक्षणाबरोबरच खेळाला व अंगी असलेल्या कलागुणांना आवर्जून वेळ द्या, असेही त्यांनी सांगितले.

यासाठी डिजिटल पेंट आर्टिस्ट शुभम बिरांजे यांनी सहकार्य केले. दळवी’ज आर्ट चे प्राचार्य अजेय दळवी, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर, उदय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार    &nbs…