Home क्राईम केंद्रीय कृषी विभागाची बोगस खात विक्रीवर कारवाई

केंद्रीय कृषी विभागाची बोगस खात विक्रीवर कारवाई

3 second read
0
0
42

no images were found

केंद्रीय कृषी विभागाची बोगस खात विक्रीवर कारवाई

कोल्हापूर : राज्याचे गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील किणी येथे सुमारे 4 लाख रकमेचे 13.5 मेट्रीक टन बोगस खत जप्त केले. या संबंधित दोन्ही कंपन्या व प्रियांका अँग्रो सर्व्हिसेस, किणीचे प्रोप्रायटर आल्पी करुदाद लोबो यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खत विक्रेत्यांनी व शेतकऱ्यांनी खत कंपन्यांच्या परवान्याची व त्यातील खतांच्या ग्रेडची खात्री करुन पक्की पावती घेऊनच खतांची खरेदी करावी. तसेच येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कृषी निविष्ठा विषयी शंका आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले आहे.

चंदगड तालुक्यातील किणी येथील प्रियांका अँग्रो सर्व्हिसेस या खतविक्री केंद्रामध्ये क्रॉप्स फर्टिलायझर प्रा. लिमिटेड,मेहसाना, गुजरात कंपनीच्या NPK=18:18:10, NPK=20:20:00 या व एसएच ॲग्रो इंडस्ट्रिज, अहमदाबाद, गुजरात या कंपनीची 100 टक्के पाण्यात विद्राव्य खतांचे नमुने गुणनियंत्रण विभागीय भरारी पथक प्रमुख बंडा कुंभार यांनी विश्लेषणासाठी काढले होते. त्यामध्ये NPK प्रमाण अत्यंत नगन्य आले. तसेच या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्र शासनाचा खतविक्री परवाना न घेता विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबधित दोन्ही कंपनी व खत विक्रेता यांनी खत नियंत्रण आदेश-1985 व आत्यावश्यक वस्तू अधिनियम-1955 मधील तरतुदींचा भंग केल्याने खत निरीक्षक श्री. कुंभार यांनी चंदगड पोलीसांत फिर्याद दिली. त्यावरुन संबंधित दोन्ही कंपन्या व प्रियांका अँग्रो सर्व्हिसेस, किणीचे प्रोप्रायटर आल्पी करुदाद लोबो यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …