
no images were found
मौजे तिळवणी येथे स्वच्छता अभियान व रक्तदान शिबीर संपन्न
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय पर्वअंतर्गत सामाजिक
न्याय विभागाच्यावतीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय, मौजे तिळवणी यांच्यावतीने
सामाजिक न्याय पर्वातंर्गत हातकणंगले तालुक्यातील मौजे तिळवणी येथे स्वच्छता अभियान व रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान
शिबीरामध्ये एकूण 15 व्यक्तींनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. यावेळी मौजे तिळवणी गावचे
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, कार्यालयाचे सर्व कर्मचारी, आश्रमशाळा, शासकीय निवासी शाळा, मुला-मुलींची
शासकीय वसतिगृहे येथील सर्व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला मोठ्या
संख्येने उपस्थित होते.