
no images were found
अजितदादांच्या चर्चांवर शरद पवार काय म्हणतात
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली.
, तुमच्या मनात जी काही चर्चा आहे, ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला काही अर्थ नाही. कुणीतरी बातम्या पिकवतय यापेक्षा त्याला अधिक काही महत्व नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आमच्या प्रत्येक सदस्याच्या मनात पक्षाला शक्तिशाली करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार कुणाच्याही मनात नाही. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मी बैठक बोलावली आहे, ही बातमी खोटी आहे, असे रोखठोक प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
मी वर्तमानपत्रात वाचल काहीतरी बैठक बोलवलीय पण मी अशी कुठलीही बैठक बोलवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील बाजार समितीच्या निवडणुकीच्या कामात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यांवर या निवडणुकीची जबाबदारी दिली गेली आहे,शरद पवार यांनी म्हटलं की, मी जे सांगतोय ते अध्यक्ष म्हणून सांगतोय. त्यापेक्षा काही महत्वाचं नाही. अजित पवार यांच्यासोबत काही आमदार फुटून भाजपात जाणार असल्याच्या चर्चेविषयी शरद पवार यांना पुन्हा विचारले असते ते म्हणाले, मी एकदा विषय स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला त्यासंबंधी फाटे फोडण्याचा अधिकार नाही. शरद पवार आणि अजित पवार जे एकत्र बसून ठरवतात आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतो. आमचा पक्ष एकसंघ आहे आणि एकसंघ राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी दिली आहे.