Home राजकीय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

1 second read
0
0
40

no images were found

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही नॉट रिचेबल आहेत.त्यांनी आपले दोन्हीही फोन बंद ठेवले आहेत. दरम्यान धनंजय मुंडे हे काल संभाजीनगरला जाऊन आलेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे  नेते अजित पवार  हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असताना. दुसरीकडे धनंजय मुंडे मुंबई कडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद असल्याने या राजकीय घडामोडीचे गूढ आणखी वाढले आहे. या संपूर्ण घटनेमुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Load More Related Articles

Check Also

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून “ज्ञान पोस्ट” सेवा सुरु

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून “ज्ञान पोस्ट” सेवा सुरु  …