
no images were found
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल – सत्र 13 ला मिळाले टॉप 6 फाईनलिस्ट!
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सत्र 13 या प्रतिष्ठित गायन रियालिटी शो ला अखेरीस आपले सर्वोत्तम 6 स्पर्धक मिळाले आहेत, जे अंतिम फेरीत धडक देतील. हे असे 6 स्पर्धक आहेत, ज्यांनी परीक्षक हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांना आपल्या परफॉर्मन्सने एकामागून एक अनेक आठवडे प्रभावित केले आहे.
अयोध्येचा ऋषी सिंह, कोलकाताहून आलेली बिदीप्ता चक्रवर्ती, सोनाक्षी कर आणि देबोस्मिता रॉय, जम्मू आणि काश्मीरचा चिराग कोटवाल आणि बडोद्याचा शिवम सिंह हे 6 स्पर्धक आता शेवटच्यांदा आपल्या सुरेल आवाजाने मौसम म्युझिकाना करण्यासाठी सरसावले आहेत. ड्रीम फिनालेमध्ये या 6 जणांपैकी एक स्पर्धक ‘इंडियन आयडॉल – सत्र 13’ चा किताब पटकावेल व त्याचबरोबर मारुती सुझुकी इंडियाने सादर केलेली नवीन टेकी ब्रेझा देखील सोबत घेऊन जाईल.