Home मनोरंजन बॉलीवूडची मोहक अभिनेत्री सोनाली बेंद्रे परीक्षक म्हणून दिसणार इंडियाज बेस्ट डान्सर सत्र 3 मध्ये

बॉलीवूडची मोहक अभिनेत्री सोनाली बेंद्रे परीक्षक म्हणून दिसणार इंडियाज बेस्ट डान्सर सत्र 3 मध्ये

4 second read
0
0
69

no images were found

बॉलीवूडची मोहक अभिनेत्री सोनाली बेंद्रे परीक्षक म्हणून दिसणार इंडियाज बेस्ट डान्सर सत्र 3 मध्ये

 

अत्यंत आकर्षक रियालिटी शोजच्या माध्यमातून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने वेळोवेळी दर्जेदार प्रतिभा उत्कृष्ट मनोरंजनातून सादर केली आहे. इंडियाज बेस्ट डान्सर हा सोनीने स्वतः तयार केलेला फॉरमॅट आहे. त्याच्या तिसऱ्या सत्रातून प्रतिभेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी ही वाहिनी आता सज्ज झाली आहे. डान्स, वैविध्य आणि आनंद यांची हमी देणारे इंडियाज बेस्ट डान्सरचे तिसरे सत्र डान्स रसिकांसाठी एक पर्वणीच असणार आहे. यावेळेस टेरेन्स लुईस आणि गीता कपूरसोबत परीक्षकांच्या पॅनलमध्ये दाखल होणार आहे, बॉलीवूडची मोहक अभिनेत्री सोनाली बेंद्रे.टेरेन्स लुईस आणि गीता कपूर ‘टेकनिक’ आणि ‘नवीनता’ या निकषांवर स्पर्धकांना पारखतील, तर सोनाली बेंद्रेचा भर ‘मनोरंजन’ आणि ‘भावना’ यावर विशेष असेल. डान्सच्या नवीन युगात या सत्रात तेच स्पर्धक तग धरून राहतील आणि पुढे जातील, ज्यांच्या मूव्ह्ज्सार्थ असतील आणि या कला प्रकारातून ते स्वतःला कसे अभिव्यक्त करतात हे या स्पर्धेत तपासले जाईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…