Home गौरव सन्मान कोल्हापूर जिल्ह्यासाठी सरपंच सौ. कविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६

कोल्हापूर जिल्ह्यासाठी सरपंच सौ. कविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६

1 min read
0
0
36

no images were found

कोल्हापूर जिल्ह्यासाठी सरपंच सौकविता माने यांना ‘महाधन योद्धा पुरस्कार २०२६

कोल्हापूर, : प्रगत शेती आणि वैज्ञानिक पीक पोषण पद्धतींमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाधन अ‍ॅग्रीटेक लिमिटेड (एमएएल) तर्फेकोल्हापूर, जिल्ह्यातील पन्हाळा लुक्यातील सरपंच सौकविता सरदार माने यांना ऊस लागवडीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा ‘महाधन योद्धा पुरस्कार – 2026’ प्रदान करण्यात आला. लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, न्यू टिळक रोड, अहिल्यानगर येथे आयोजित सत्कार समारंभात शेतकरी, ग्रामस्थ, कृषी क्षेत्रातील मान्यवर आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       महाधन योद्धा पुरस्काराद्वारे संतुलित पीक पोषण, वैज्ञानिक शेती पद्धती आणि कार्यक्षम अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून उल्लेखनीय उत्पादनक्षमता साध्य करणाऱ्या प्रगत शेतकऱ्यांचा गौरव केला जातो. हा सन्मान पीक उत्पादनक्षमता आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक पीक पोषण उपाययोजनांचे वाढते महत्त्व अधोरेखित करतो.

महाधन अ‍ॅग्रीटेक लिमिटेडच्या,‘महाधन’ या प्रमुख ब्रँडअंतर्गत भारतीय शेतकऱ्यांना पिकानुसार पोषण उपाय उपलब्ध करून देण्यात अग्रणी राहिली आहे. प्रगत खत उत्पादने आणि शेतकरी-केंद्रित नवकल्पनांच्या माध्यमातून कंपनी विविध पिके आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पिकांमध्ये शाश्वत कृषी विकासाला चालना देत आहे.

कार्यक्रमात बोलताना पुरस्कार विजेते सरपंच सौकविता माने म्हणाले,“महाधनच्या क्रॉपटेक 9:24:24 मुळे माझ्या ऊस पिकाच्या वाढीत लक्षणीय सुधारणा झाली. उसाची जाडी वाढली, कांडीची  लांबी व जाडी सुधारली, फुटव्यांची वाढ लवकर झाली आणि मजबूत फुटव्यांची जोमदार वाढ दिसून आली. गाळपयोग्य उसांची संख्या वाढल्याने आणि पिकाची कामगिरी सुधारल्याने मला जवळपास 15% अधिक आर्थिक परतावा मिळाला. योग्य  व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे उत्पादन व नफा दोन्हीमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो, हे यामुळे सिद्ध झाले.” या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देतान महाधन ॅग्रीटेक लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश देशमुख म्हणाले, “महाधन योद्धा पुरस्कार हा प्रगत आणि विज्ञानाधारित कृषी पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.  सरपंच सौ. कविता सरदार माने यांच्यासारखे शेतकरी संतुलित पीक पोषणामुळे उत्पादनक्षमता, नफा आणि शाश्वतता यामध्ये सकारात्मक बदल कसा घडवता येतो, हे दाखवून देतात. महाधनमध्ये आम्ही पिकांच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण पोषण उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर सातत्याने भर देत आहोत.”

       कंपनीची पिकानुसार विकसित केलेली पोषण उत्पादने विविध जमिनी व पिकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. क्रॉपटेकसह महाधनची प्रगत उत्पादने मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण उपलब्ध करून देतात, ज्यामुळे अन्नद्रव्य शोषण व पिकांची कामगिरी सुधारते. अशा उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना उत्पादनक्षमता वाढवणे, खतांचा कार्यक्षम वापर करणे आणि पिकांची गुणवत्ते बरोबरच जमिनीचे आरोग्य सुधारणे शक्य झाले आहे.

      महाधन योद्धा पुरस्काराच्या माध्यमातून महाधन अ‍ॅग्रीटेक लिमिटेड आधुनिक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्याबरोबरच ज्ञान, नवकल्पना आणि समर्पणाच्या जोरावर भारतीय शेतीत परिवर्तन घडवणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करत आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…