
no images were found
मालिका ‘मॅडम सर’मध्ये उर्मिलाचे पुनरागमन होणार?
अनेक ड्रामा व मनोरंजनाने भरलेली सोनी सबवरील सुपर कॉप मालिका ‘मॅडम सर’दर आठवड्याला प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट्सचे मनोरंजन देत आहे. आणि आता एक नवीन ट्विस्ट व सरप्राइज पाहायला मिळणार आहे, जेथे उर्मिलाचे पुनरागमन होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे! लवकरच प्रेक्षकांना मालिकेमध्ये उर्मिलाचा स्वॅग पाहायला मिळणार आहे.
नकळतपणे सायराची हत्या करणारी शिवानी ताई स्वत: एमपीटीमधील पोलिस अधिकाऱ्यांकडे शरण जाते. एमपीटीमधील सर्वांना चिंगारी गँगवर मिळवलेल्या विजयाचा आनंद होतो. करिष्मा व हसीना धमाल करण्यासोबत फुगडी घालतात. पण हसीना स्वत:चे संतुलन गमावते आणि भिंतीवर तिचे डोके आदळून खाली कोसळते. आणखी एक रोमांचक वळण म्हणजे हसीना शुद्धीवर येते तेव्हा ती स्वत: उर्मिला असल्याचे सांगते. एमपीटीमधील सर्वजण स्तब्ध होतात. पण करिष्मा हसीनाला प्रश्न विचारते, तसेच करिष्माला ती ढोंग करत असल्याचा संशय येतो.