
no images were found
श्वेता तिवारीने साधला आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अचूक समतोल!
झी टीव्ही आपल्या प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका घेऊन आली असून त्यात मोहिनीबरोबर (श्वेता गुलाटी) लग्न करण्यासाठी अक्षयने (मानव गोहिल) आपली पत्नी अपराजिता (श्वेता तिवारी) हिला आणि आपल्या तीन मुलींना सोडून दिले असते. परिणामी जीवनातील खडतर परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाता यावे, यासाठी अपराजिता आपल्या मुलींचे संगोपन कसे करते, त्याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. मालिकेत सध्या अतिशय नाट्यपूर्ण घडामोडी घडत असून आपली मुलगी छवीने वीर या मुलाशी लग्न करावे, यासाठी तिचे मन वळवण्यासाठी अक्षय अपराजितावर दबाव आणत आहे. पण अपराजिताला वीरबद्दल पुरेशी खात्री नसते, त्यामुळे तो छवीसाठी योग्य पती आहे की नाही, याबद्दल तिच्या मनात शंका असते.
छवी (अनुष्का मर्चंडे), दिशा (ध्वनी गोरी) आणि आशा (श्रुती चौधरी) या तीन मुलींच्या आईची भूमिका साकारणारी श्वेता तिवारी ही वास्तव जीवनात दोन मुलांची आई आहे. तिच्या 22 वर्षीय मुलीचे नाव पलक असून सहा वर्षांच्या मुलाचे नाव रियांश आहे. मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकानुसार श्वेता तिवारीला दिवसाचा बहुतांश काळ सेटवर उपस्थित राहावे लागते. त्यामुळे तिने आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अचूक समतोल साधला आहे. ती आपल्या मुलाला सेटवर घेऊन येते, त्यामुळे तिला त्याच्याबरोबर बराच काळ काढता येतो. विशेष म्हणजे ‘मैं हूँ अपराजिता’ मालिकेतील सर्व सहकलाकार, मानव गोहिल, श्वेता गुलाटी आणि तिन्ही मुली यांना रियांश सेटवर आल्यावर खूप आनंद होतो. श्वेता चित्रीकरण करीत असताना हे सर्वजण त्याची खूप काळजी घेतात.