
no images were found
हिवाळ्यामध्ये स्टायलिश दिसण्यासाठी फॅशन टिप्स व ट्रिक्स!
हळूहळू थंडी वाढत आहे आणि या बदलत्या ऋतूसह हवामानानुसार नवीन स्टाइल करण्याप्रती ओढ वाढत आहे. स्टाइलबाबत तडजोड न करता हिवाळ्यामध्ये आकर्षक दिसण्यासाठीएण्ड टीव्हीवरील कलाकार त्यांच्या वॉर्डरोब्समध्ये सुधारणा करत आहेत आणि हिवाळ्यामधील त्यांच्या सर्वोत्तम फॅशन स्टाइल्सबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेतनेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी मॉं’), कामना पाठक (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणिविदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी, ‘भाबीजी घर पर है’). एण्ड टीव्हीवरील मालिका‘दूसरी मॉं’मध्येयशोदाची भूमिका साकारणाऱ्यानेहा जोशीम्हणाल्या, “हिवाळ्यामध्ये राजस्थानमधील वातावरण खूपच थंड होऊन जाते आणि रात्रीच्या वेळी सरासरी तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. मी महाराष्ट्रामध्ये अधिक वास्तव्य केले आहे, ज्यामुळे जयपूरमधील हिवाळा माझ्यासाठी स्वागतार्ह बदल आहे. येथे उबदार राहण्यासाठी स्वेटर घालणे आवश्यक आहे. मला खासकरून हिवाळा ऋतू खूप आवडतो, येथील हवामान शुष्क किंवा अर्ध-शुष्क असते आणि वर्षातील इतर वेळी तापमान अत्यंत तप्त असते. रात्रीच्या वेळी तापमान मोठ्या प्रमाणात कमी होते. म्हणून मी पुढील काही महिने माझ्या वॉर्डरोबमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. येथील विंटर वेअर आकर्षक असते आणि त्यामध्ये शाही राजस्थानचे रंग व संस्कृती सामावलेली असते. या वेअरमधून उबदार वाटते आणि ते तुमच्या लुकला साजेसे असण्यासोबत फॅशनेबल असतात. मी दिवसभर माझी वजनाने हलकी कॉटन कुर्ती आणि सूर्यास्तानंतर लोकरी जॅकेट परिधान करते, जे मी नुकतेच जयपूरमधील प्रसिद्ध नेहरू मार्केटमधून खरेदी केले आहे. मी माझ्या वॉर्डरोबमध्ये विविध रंगांच्या शालींचा देखील समावेश केला आहे, जे मी यशोदा म्हणून माझे सीन्स साकारताना परिधान करते