Home आरोग्य स्‍टार हेल्‍थने महाराष्ट्रातील १५ ठिकाणी आरोग्‍य तपासणी शिबिरे आयोजित करून पूर्ण केली २० वर्षे

स्‍टार हेल्‍थने महाराष्ट्रातील १५ ठिकाणी आरोग्‍य तपासणी शिबिरे आयोजित करून पूर्ण केली २० वर्षे

52 second read
0
0
28

no images were found

स्‍टार हेल्‍थने महाराष्ट्रातील १५ ठिकाणी आरोग्‍य तपासणी शिबिरे आयोजित करून पूर्ण केली २० वर्षे

मुंबई: आपल्या सेवा क्षेत्रातील २० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने महाराष्ट्रातील १५ ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत. याद्वारे स्थानिक समुदायांपर्यंत मुलभूत तपासणी, आरोग्य जागरूकता आणि आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करण्याची सुविधा पोहोचवण्यात आली. पुणेसाताराअहिल्यानगरबारामतीदौंडकोल्हापूरधुळेछत्रपती संभाजीनगरजळगावअकोलानांदेडलातूरधाराशिवनंदुरबार आणि बीड येथे हा उपक्रम राबवण्‍यात आला, जेथे वेळेवर निदान आणि सक्रिय आरोग्य सेवेची व्यापक उपलब्धता वाढवण्यावर भर देण्यात आला.या बहु-शहरी संपर्क मोहिमेचा भाग म्हणून, स्टार हेल्थने ४,५०० हून अधिक सहभागींना आरोग्य तपासणी सुविधा पुरवल्या. यामध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची चाचणी, बीएमआय मूल्यमापन, डोळ्यांची तपासणी आणि सामान्य डॉक्टरांच्या सल्ल्याचा समावेश होता. पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रिपोर्टनुसार मार्गदर्शन करण्यात आले आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त सल्ल्यासाठी संदर्भित करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ ग्राहक, सल्लागार, कर्मचारी आणि स्थानिक समुदायातील वंचित घटकांना मिळाला; ज्यामध्ये आजारांना प्रतिबंध करणे, लवकर निदान करणे आणि आरोग्य जागरूकतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

या उपक्रमाच्या व्यापक महत्त्वाबाबत मत व्‍यक्त करत स्‍टार हेल्‍थ इन्‍शुरन्‍सचे पूर्णवेळ संचालक श्री. हिमांशू वालिया म्हणाले, “गेल्या २० वर्षांत, स्टार हेल्थने लाखो कुटुंबांना केवळ क्लेमच्या वेळीच नव्हे, तर त्यांच्या आरोग्य आणि वेलनेसच्या संपूर्ण प्रवासात साथ देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आहे. यासारखे उपक्रम समुदायांप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेची व्याप्ती आणि खोली दर्शवतात; तसेच अधिक जागरूकता निर्माण करण्यास, लवकर निदान करण्यास प्रोत्साहित करण्यास आणि आरोग्य सेवांची उपलब्धता सुधारण्यास मदत करतात. महाराष्ट्रात आमच्या प्रबळ उपस्थितीसह, आम्ही आरोग्य विमा आणि व्यापक आरोग्य व वेलनेस प्रयत्नांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यावर आमचे लक्ष केंद्रित ठेवत आहोत.”या उपक्रमाबाबत मत व्‍यक्त करत स्‍टार हेल्‍थ इन्‍शुरन्‍सचे बिझनेस हेड श्री. विजय अरोरा म्हणाले, “महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण राज्यात, हायपरटेंशन (उच्च रक्तदाब), मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारखे जीवनशैलीशी संबंधित धोके अधिक गंभीर होण्यापूर्वीच ते ओळखण्यात कम्युनिटी आउटरीच महत्त्वाची भूमिका बजावते. या शिबिरांच्या माध्यमातून, आम्ही संपूर्ण राज्यातील लोकांच्या राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणापर्यंत सक्रिय आरोग्य सेवा, मुलभूत तपासणी आणि आरोग्य जागरूकता पोहोचवत आहोत. हा उपक्रम महाराष्ट्रातील विविध समुदायांसाठी आरोग्य सेवा अधिक सुलभ बनवण्याच्या आमच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…