no images were found
गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, १ व ५ डिसेंबरला मतदान
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यंदा गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्य मतदान होणार आहे. पहिला टप्पा १ आणि दुसरा टप्पा ५ डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही ८ डिसेंबरला होणार आहे. विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी दोन टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे.
पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होईल. तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीला ४९ कोटी मतदार मतदान करतील असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी एकूण ५१ ७८२ मतदान केंद्र असून महिलांसाठी १२७४ मतदान केंद्र आहेत. तर दिव्यांगासाठी १८२ खास मतदान केंद्र उभारले आहे. तर १४२ आदर्श मतदान केंद्र आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे, ४.६१ लाख तरुण मतदार असून ३.२४ लाख नवे मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत .
गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे : पहिल्या टप्प्यासाठी ५ नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार दुसऱ्या टप्प्यासाठी १० नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार
पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेबर आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे.
उमेदवारी अर्ज छाननी अशी आहे. पहिला टप्पा: १५ नोव्हेंबर तर
दुसरा टप्पा:१८ नोव्हेंबर आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे आहे. पहिला टप्पा: १७ नोव्हेंबर रोजी असून
दुसरा टप्पा: २१ नोव्हेंबर होणार आहे.