no images were found
अंबाबाई मंदिरात आणखी एक शिलालेख आढळला
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आणखी एक शिलालेख आढळला आहे. त्यामुळे मंदिराच्या बांधकामाची माहिती प्रकाशात आली आहे. मंदिराची स्थापना ही ७०० ते ८०० वर्षांपूर्वी झाली असल्याचे दाखले मिळतात. मंदिराच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा आणखी एक शिलालेख आढळला आहे.
इसवीसनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळला आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिली आहे
हा शिलालेख संस्कृत भाषा व देवनागरी लिपीत आहे. सोळा ओळी आहेत. हा गद्धेगाळी शिलालेख आहे. साधारण 2 फूट लांब व 1 फूट रुंद आहे. मूळ मंदिराचा भाग असलेला व नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून याचा भिंतीकरिता वापर केला आहे.सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्व भिंतीत हा शिलालेख आडवा आहे.मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्यासाठी सुरू केलेल्या संर्वधन प्रकल्पात सदर शिलालेख उजेडात आला आहे. प्रशासन व्यवस्थापनने शिलालेखाचे भाषांतर झाल्यावर सविस्तर माहिती प्रकाशित करु असे म्हटले आहे.