Home आरोग्य महापालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीर

महापालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीर

2 second read
0
0
168

no images were found

महापालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीर

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर केशवराव भोसले नाटयगृह येथे सकाळी आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. हे शिबीर प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त रविकांत अडसूळ व आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आले.

हे शिबीर महिलांमध्ये कॅन्सरबाबत जनजागृती, कॅन्सरचे परिक्षण व लक्षणे, कॅन्सर निदान व उपचार, कॅन्सरबाबत समज व गैरसमज याची माहिती देण्यासाठी घेण्यात आले. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ.राधिका जोशी, डॉ.निरुपमा सखदेव, डॉ. रेश्मा पवार, डॉ. शर्वरी मिरगुंडे, कॅन्सर सर्जन डॉ.यशस्वीनी चौधरी यांनी कॅन्सरबाबत महिलांना मार्गदर्शन करुन घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली. यामध्ये तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना कर्करोगाबाबत संवादाची असलेली गरज, जीवनशैलीमध्ये करावयाचे बदल, गर्भाशयाच्या मुखाचे व स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण याबाबतची लक्षणे, तपासणी व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी यावेळी बोलताना महानगरपालिकेच्यावतीने सावित्रीबाई फुले व श्री पंचगंगा रुग्णाल येथे कर्करोगाबाबतची प्राथमिक तपासणी करण्याकरीता प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल. या शिबीराच्या माध्यमातून समाजामध्ये महिलांनी जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास महापालिकेच्या महिला अधिकारी/कर्मचारी, शिक्षण मंडळ व केएमसी कॉलेजकडील शिक्षिका, विद्यार्थींनी, आशा वर्कस, नर्सिंग कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थींनी, अंगणवाडी सेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या. या शिबीरामध्ये 650 महिलांनी सहभाग घेतला असून यामध्ये 77 महिलांची कर्करोबाबत तपासणी करण्यात आली. यामध्ये 50 महिलांची Pap smear (गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी) करण्यात आली. या शिबीराचे प्रास्ताविक प्रशासन वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजूश्री रोहिदास यांनी केले तर सिस्टर सुवर्णा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …