Home सामाजिक धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

15 second read
0
0
116

no images were found

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

 कोल्हापूर :  धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता  पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय/ तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांकरीता वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे – विद्यार्थी धनगर समाजातील असावा. जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था /महाविद्यालये ज्या शहराच्या ठिकाणी आहेत अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी पात्र राहतील. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद, वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परीषद, वस्तुकला परीषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मान्यता प्राप्त महाविद्यालये/ संस्थेमध्ये मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळाला असावा. इयत्ता 12 वी नंतरच्या तंत्रशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीकृत (कॅप) प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. विद्यार्थ्यी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील. तसेच प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांस अदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. योजनेतंर्गत पात्र विद्यार्थ्यांस भोजन भत्ता 25 हजार रु., निवास भत्ता 12 हजार रु., निर्वाह भत्ता 6 हजार रु.असे एकूण 43 हजार रु. अनुज्ञेय राहतील.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…