no images were found
जिल्ह्यात 29 एप्रिल पर्यंत बंदी आदेश लागू
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात यात्रा, उरुस साजरे होणार आहेत. या दरम्यान एखादे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होवून अनपेक्षित घटना घडू शकते. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये दि. 18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी रात्री 24 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केले आहेत.