
no images were found
अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ सिनेमाच्या अभिनेत्रीचा एक्सिडेंट
बेळगांव : The Kerala Story मधीत अभिनेत्री अदा शर्मा, समोर आली हेल्थ अपडेट ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमानं नुकताच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. सिनेमाची सर्वत्र चर्चा आणि वाद सुरू असताना केरळ स्टोरीची प्रमुख अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाला आहे. अदाच्या अपघाताची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. कारण द केरळ स्टोरीवरून निर्माण झालेल्या वादात अभिनेत्री अदा शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या त्यामुळे तिच्या या अपघातानंतर तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. अदाने अपघाताच्या काही तासांनी ट्रिटवर पोस्ट लिहित तिच्या प्रकृतीची माहिती सर्वांना दिली.
रविवारी 14 मे रोजी द केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा यांना करीमनगरमध्ये हिंदू एकता यात्रेत सहभागी व्हायचं होतं. दरम्यान तिथे पोहचत असताना सिनेमाच्या टीमचा अपघात झाला. अपघातात काही जण जख्मी झाले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघाताच्या काही तासात अदानं त्वरित ट्रिट करत सगळ्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
अदानं ट्विट करत मी ठिक असून मला काही झालेलं नाही असं सांगितलं तिच्या या विटनंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला, अदाने केलेल्या द्विटमध्ये तिनं म्हटलं. ‘मित्रांने मी ठिक आहे. आमच्या अपघाताच्या बातमीनंतर मला अनेक मेसेज आले. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की, आमची संपूर्ण ठीक आहे. कोणीही गंभीर नाही. काही मोठं झालेलं नाही. तुम्ही आमच्याबद्दल काळजी व्यक्त केली त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनीही ट्रिट करत माहिती दिली. ते म्हणाले, ‘आज आम्ही युवा सभेच भाग घेऊन सिनेमाबद्दल सांगणार होतो. त्यासाठी आम्ही करीमनगरला येणार होतो, पण आमचं दुर्भाग्य की आपत्कालीन परिस्थितीमुळे आम्हाला यात्रेस सहभाग घेता आला नाही. करीमनगरच्या लोकांची त्याकरिता माफी मागतो. आपल्या मुलींना वाचवा हा संदेश देण्यासाठी आम्ही हा सिनेमा बनवला आहे. प्लिज आम्हाला सपोर्ट करा.
द केरळ स्टोरी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान अभिनेत्री अदा शर्माला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतके वाद होऊनही द केरल स्टोरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. सिनेमाबद्दल अनेक जण चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत, तर काही जण सिनेमावर टिका करत आहेत. अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांनी दाद दिली आहे. सिनेमानं प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाई केली आहे. शनिवारी सिनेमानं 100 कोटींचा टप्पा गाठला. द केरळ स्टोरी हा 2023मध्ये 100 कोटीचा टप्पा गाठणारा चौथा सिनेमा ठरला आहे.