Home सामाजिक केवळ एकमेकांना मायेचा आधार देण्यासाठी वयाच्या सत्तरीत ते झाले विवाहबद्ध,

केवळ एकमेकांना मायेचा आधार देण्यासाठी वयाच्या सत्तरीत ते झाले विवाहबद्ध,

12 second read
0
0
61

no images were found

केवळ एकमेकांना मायेचा आधार देण्यासाठी वयाच्या सत्तरीत ते झाले विवाहबद्ध,

  कुरुंदवाड : जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीरसुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. उर्वरित आयुष्यात एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन एकमेकांना मायेचा आधार असावा इतकीच माफक अपेक्षेने घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील दोन समदु:खी वृद्ध वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले.

           वृद्धापकाळात नातेवाईक वाऱ्यावर सोडले की आपल्या आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र साथीदारालाही दैवाने हिरावून घेतले, तर वृद्धाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही.घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदु:खी वृद्ध वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमचालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धूमधडाक्यात लग्न लावून दिल्याने या विवाहाची चर्चा रंगली आहे.

            या दोघांनी स्वखुशीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांची इच्छा पूर्ण करून सहचरणीबरोबर आनंदी जीवन जगण्यासाठी थाटात लग्न करून दिले. लग्नानंतरही वृद्धाश्रमातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

          अनुसया शिंदे (७०, मूळ रा. वाघोली, जि. पुणे) अशी वृद्ध नववधू, तर वराचे बाबूराव पाटील (७५, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) असे नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून येथील वृद्धाश्रमात आहेत. शरीराने स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. दोघांचेही साथीदार देवाघरी गेले आहेत. त्यामुळे या समदु:खी वृद्धांनी एकमेकांच्या आयुष्यातील दु:खाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेऊन गुरुवारी वृद्धाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…