
no images were found
शिवाजी विद्यापीठात आज कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने गुरुवार दि. 24 रोजी कॅमेरा हँडलिंग या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. अध्यासनाच्या नवीन इमारतीमध्ये दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत ही कार्यशाळा होईल. बी न्यूजचे वरिष्ठ कॅमेरामन प्रशांत आयरेकर आणि दैनिक पुढारीच्या डिजिटल आवृत्तीचे कॅमेरामन रवींद्र बागल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेला पत्रकार, विद्यार्थी आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.