
no images were found
शिवाजी विद्यापीठात १२डिसेंबर रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राच्या वतीने दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वा. वि.स. खांडेकर भाषाभवन येथे ‘लोकविद्या आणि लोकसंस्कृती : अभ्यास आणि संवर्धन‘या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्हयातील महाविद्यालयातील समन्वयक या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. महाविद्यालयांच्या पातळीवर लोककला, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचे संकलन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने ‘लोकविद्या आणि लोकसंस्कृती : अभ्यास आणि संवर्धन‘हा बृहद प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे कार्य गतिमान करण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील असतील. या चर्चासत्रामध्ये डॉ.मुकुंद कुळे,मुंबई व डॉ.नीला जोशी, कागलमार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा.(डॉ.) नंदकुमार मोरे यांनी केले आहे.