no images were found
शिवाजी विद्यापीठात ‘जगण्यातलं संविधान’ परिसंवाद
कोल्हापूर : सांविधानिक मूल्यांच्या परीघविस्तारातूनच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताची भक्कम उभारणी शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘जगण्यातलं संविधान’ या विशेष परिसंवादामध्ये उमटला. संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही गप्पा भाग-८’ या कार्यक्रमांतर्गत ‘जगण्यातलं संविधान’ हा विशेष राज्यस्तरीय परिसंवाद विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, स्तंभलेखक सॅबी परेरा, प्राध्यापक डॉ. राहुल सरवटे, कीर्तनकार सचिन पवार आणि प्राध्यापक डॉ. गायत्री लेले सहभागी झाले. मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी संवादक म्हणून परिसंवादाचे समन्वयन केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, स्तंभलेखक सॅबी परेरा, प्रा. राहुल सरवटे, डॉ. गायत्री लेले, कीर्तनकार सचिन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. परिसंवादानंतर विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे मान्यवरांनी समाधानही केले. पल्लवी जाधव यांनी आभार मानले.