उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्मार्ट सुनबाई’चा टिझर प्रदर्शित कोल्हापूर(प्रतिनिधी):-एका अनोख्या, रंगेल आणि गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाणारा नवा मराठी चित्रपट “स्मार्ट सुनबाई” चित्रपटसृष्टीत नवा धमाका करायला सज्ज झालेला आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित ‘स्मार्ट सुनबाई’ चा टीझर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते ते …