no images were found
इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विताच्या आत्मकेंद्रित आईच्या रूपात अभिनेत्री नेहा एसके मेहताची एंट्री
दिवेकर कुटुंबातील आनंद, संघर्ष आणि त्यांना एकत्र बांधणाऱ्या नात्यांचे हृद्य चित्रण करून सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्याच्या कथानकाला एक रोचक वळण देताना नेहा मेहता ही अभिनेत्री अन्विता (सुंबुल तौकीर खान) च्या नाटकी आईच्या, हेतलच्या भूमिकेत दाखल होत आहे. नेहा एसके मेहता यापूर्वी तारक मेहता का ऊल्टा चश्मा मालिकेत देखील दिसली होती.
हेतलच्या एंट्रीमुळे मालिकेत नाट्य आणि मनोरंजनाची जणू नवी लाट येणार आहे. ती बडबडी आहे, भडक आहे आणि मतलबी आहे. ती नेहमी सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याची धडपड करत असते आणि आपले स्टाइलिश आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्व मिरवण्याची एकही संधी ती सोडत नाही. स्वतःची ही सुखवस्तू प्रतिमा जपण्याच्या धडपडीत ती बऱ्याचदा हास्यास्पद ठरते आणि तिच्या या स्वभावामुळे घरात गंमतीजमती होतात. पण, तिच्या या भडक मुखवट्याच्या खाली जी खरी स्त्री आहे, ती असुरक्षित आणि मनी आकांक्षा बाळगणारी स्त्री आहे. हेतल काही सर्वसाधारण असते अशी प्रेमळ आई नाही. हेतल मुलांपेक्षादेखील स्वतःचा विचार आधी करते. आपल्या हुशारीच्या आणि तोऱ्याच्या मागे ती स्वतःचा हळवेपणा लपवत असते, त्यामुळे तिच्या वागण्याचे अनुमान करणे कठीण असते, पण ती मोहक देखील आहे.
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत हेतलची भूमिका करणारी नेहा एसके मेहता म्हणते, “हृदयातील भावना आणि हलके-फुलके कौटुंबिक क्षण यांची सुंदर सांगड घालणाऱ्या या मालिकेत सहभागी होताना मी खूप रोमांचित आहे. हेतलची भूमिका करण्याचा अनुभव मजेदार असणार आहे! ती बडबडी आहे, नाटकी आहे, उत्साही आहे आणि तिच्यात अनेक अवगुण आहेत. ती आपली कमजोरी लपवत तोरा मिरवते, नाटकीपणा करते, आत्मविश्वास दाखवते पण त्यात गोंधळ माजतो आणि गंमती घडतात. मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा ही व्यक्तिरेखा फारच वेगळी आहे. अलीकडेच एक वास्तववादी भूमिका केल्यानंतर ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत दाखल होताना एक नवा आल्हाददायक अध्याय सुरू होत असल्यासारखे वाटते आहे.”