Home मनोरंजन शुभविवाह मालिकेत धमाकेदार ट्विस्ट सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची होणार एण्ट्री

शुभविवाह मालिकेत धमाकेदार ट्विस्ट सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची होणार एण्ट्री

3 second read
0
0
36

no images were found

 शुभविवाह मालिकेत धमाकेदार ट्विस्ट सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहच्या शुभविवाह मालिकेत लवकरच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत सात वर्षांचा लीप येणार असून नवं पात्र म्हणजेच एसीपी अपूर्वा पुरोहितची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार असून पहिल्यांदा ती पोलीस अधिकारी साकारणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना अपूर्वा म्हणाली, स्टार प्रवाहसोबत जिव्हाळ्याचं नातं आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत मी साकारलेल्या सावनी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. काही दिवसांपूर्वीच मी एका मुलाखतीमध्ये मला पोलीस अधिकारी साकारायला आवडेल असं म्हण्टलं होतं. माझी इच्छा या भूमिकेच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. शुभविवाह मालिकेत मी एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदा अश्या धडाकेबाज रुपात दिसणार आहे. नवं पात्र साकारताना नेहमी उत्सुकता असते. शुभविवाह मालिकेतली भूमी म्हणजेच मधुरा देशपांडेसोबत १३ वर्षांनंतर पुन्हा काम करणार आहे. आराधना मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. मधुरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे काम करताना धमाल येणार आहे अशी भावना अपूर्वाने व्यक्त केली. 

अपूर्वा पुरोहितच्या येण्यामागे नेमकं काय रहस्य आहे. तिच्या येण्याने भूमी-आकाशच्या आयुष्यावर काय परिणाम होणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका शुभविवाह दुपारी २.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …