
no images were found
कलाकारांनी सांगितला त्यांचा फिटनेस मंत्र!
आजच्या धावपळीच्या युगामध्ये व्यस्त वेळापत्रकामुळे आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वल्ड हेल्थ डे तंदुरूस्त राहण्याच्या आणि आरोग्यदायी जीवन जगण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. या दिनाला साजरे करण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकार त्यांचा फिटनेस मंत्र सांगत आहेत, तसेच व्यस्त शूटिंग वेळापत्रक असताना देखील ते कशाप्रकारे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात याबाबत देखील सांगत आहेत. हे कलाकार आहेत नीता मोहिंद्रा (कैलाशा बुआ, ‘भीमा’), हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘भीमा’मध्ये कैलाशा बुआची भूमिका साकारणाऱ्या नीता मोहिंद्रा म्हणाल्या, ”अभिनेत्री असल्याने माझी देहबोली अत्यंत महत्त्वाची आहे आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. दीर्घकाळपर्यंत शूटिंगसाठी स्टॅमिनाची गरज आहे आणि मी माझ्या शरीराला उत्तमरित्या ऊर्जा मिळण्याची खात्री घेते. सकाळी लवकर उठून मी योग व काहीसा स्ट्रेचिंग व्यायाम करते, ज्यामुळे माझे शरीर लवचिक राहते. फळे, घरी बनवलेला आहार आणि कोमट पाणी माझी पचनशक्ती उत्तम ठेवण्यास मदत करतात. मी प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करत नाही आणि दिवसभर हायड्रेटेड राहण्याची खात्री घेते. अंतर्गत शांतीसाठी मी चिंतन करते, तसेच सायंकाळी चालते, ज्यामुळे सक्रिय राहण्यास मदत होते. वय फक्त नंबर आहे, जेथे तुम्ही तुमच्या आरोग्याला प्रत्येकवेळी प्राधान्य दिले पाहिजे. आहार, व्यायाम आणि चिंतनाच्या योग्य संतुलनासह मला उत्साही वाटते आणि प्रत्येक दिवशी सुसज्ज असल्यासारखे वाटते.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये कटोरी अम्माची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय हिमानी शिवपुरी म्हणाल्या, ”जीवनातील या टप्प्यामध्ये मला समजले आहे की, स्वत:ची काळजी घेणे ही फक्त लक्झरी नाही तर गरज आहे. दीर्घकाळपर्यंत शूटिंग केल्याने थकल्यासारखे वाटू शकते, पण मी दिवसाच्या सुरूवातीला ग्लासभर कोमट पाणी पिते, ज्यामुळे माझी चयापचय क्रिया उत्तम राहण्यास मदत होते. यानंतर मी सकाळच्या वेळी चालते, जे मला उत्साहित करते. माझा आहार साधा व हलका आहे, ज्यामध्ये घरी बनवलेल्या जेवणासह फळे, नट्स व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असतो, ज्यामुळे मला ताकद व पोषण मिळते. मी हालचाल कायम राखण्यासाठी दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम आणि साधे स्ट्रेचिंग करते. आराम देखील महत्त्वाचा आहे, महणून मी माझे शरीर उत्साही ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेते. माझा विश्वास आहे की आरोग्यदायी आहाराचे सेवन, सक्रिय राहणे आणि सकारात्मक वृत्ती वाढत्या वयामध्ये देखील उत्साही व तंदुरूस्त राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये मनमोहन तिवारीची लोकप्रिय भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड म्हणाले, ”मला समजले आहे की आरोग्यदायी जीवनशैली राखणे पर्याय नसून कटिबद्धता आहे. मी सकाळी ३० मिनिटे योग करतो, ज्यामुळे संपूर्ण दिवस उत्साहात जातो. माझ्या आहारामध्ये मिक्स भाज्या, फळे, लीन प्रोटीन्स असतात, तसेच आता उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे मी भरपूर प्रमाणात पाणी देखील पितो. दीर्घकाळपर्यंत शूटिंगदरम्यान ऊर्जा कायम ठेवण्यासाठी मी गोड ट्रीट्स ऐवजी नट्स व बिया यांसारख्या आरोग्यदायी स्नॅक्सचे सेवन करतो. मी आराम देखील करतो आणि सीन्सदरम्यान लहान-लहान ब्रेक्स घेऊन स्ट्रेचिंग करतो. फिटनेस फक्त चांगले दिसण्यासाठी नाही तर देहबोली उत्तम ठेवण्यासाठी आणि दररोज १०० टक्के योगदान देण्यास सक्षम होण्यासाठी आहे.”