Home मनोरंजन लवकरच सुरु होणाऱ्या मराठी मिडियम मालिकेतील अभिनेत्री श्रद्धा पवारचा थक्क करणारा प्रवास

लवकरच सुरु होणाऱ्या मराठी मिडियम मालिकेतील अभिनेत्री श्रद्धा पवारचा थक्क करणारा प्रवास

8 second read
0
0
12

no images were found

लवकरच सुरु होणाऱ्या मराठी मिडियम मालिकेतील अभिनेत्री श्रद्धा पवारचा थक्क करणारा प्रवास

    स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणाऱ्या मराठी मिडियम मालिकेची घोषणा होताच चर्चा रंगली ती मालिकेच्या मुख्य नायिकेची. सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा पवार या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

     श्रद्धाचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय राहिला आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या श्रद्धाने शालेय जीवनात विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. तिच्या अभिनयाला आणि व्यक्तिमत्त्वाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला.

     गेल्या चार वर्षांत श्रद्धाने अनेक मालिकांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. मुख्य अभिनेत्री बनण्याचं स्वप्न मनात बाळगून ती सातत्याने मेहनत घेत राहिली. अखेर अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला मराठी मिडियम मालिकेच्या ऑडिशनसाठी संधी मिळाली. चार टप्प्यांच्या ऑडिशन प्रक्रियेनंतर श्रद्धाची या भूमिकेसाठी निवड झाली आणि खऱ्या अर्थाने मेहनतीचं फळ तिला मिळालं.

     मराठी मिडियम मालिकेत श्रद्धा सरस्वती खेडेकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मराठी शाळेच्या अस्तित्वासाठी झटणारी, आपल्या संस्कृतीचा आणि मातृभाषेचा अभिमान बाळगणारी सरस्वती ही भूमिका श्रद्धासाठी एक मोठं आव्हान आणि तितकीच महत्त्वाची संधी ठरणार आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

कोणाचीही मुलाहिजा न बाळगता विनाडोनेशन पारदर्शी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा; जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये : आमदार राजेश क्षीरसागर

  कोणाचीही मुलाहिजा न बाळगता विनाडोनेशन पारदर्शी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा; जिल्ह्या…