no images were found
‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत अचिंत कौर खलनायिकेच्या रूपात दिसणार
सोनी सबवर 6 ऑक्टोबरपासून एक भव्य पौराणिक मालिका सुरू झाली आहे, ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत केवळ शंकर (मोहित मलिक), पार्वती (श्रेनु परीख), गणेश (एकांश कथोरिया) आणि कार्तिकेय (सुभान खान) यांचा दिव्य प्रवास वर्णिलेला नाही, तर या शिव परिवाराला जोडणारी कौटुंबिक नाती, भावना आणि मूल्ये यांचेही चित्रण यात बघायला मिळत आहे.
अनेक उत्तमोत्तम कलाकारांपैकी अचिंत कौर ही एक अभिनेत्री आहे, जी दितीच्या भूमिकेत दिसणार आहे. दिती ही असुर कुलाची भयावह माता आहे. दितीची कहाणी वेदना, ताकद आणि उद्देश यांची कहाणी आहे. प्रेम, नुकसान आणि बदला यांनी तिचे जीवन घडले आहे. एक समर्पित पत्नी आणि माता असलेल्या दितीचे आयुष्य तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या आणि तिच्या मुलांच्या मृत्यूनंतर वेदनामय होते आणि त्या दुःखात ती अंधःकाराकडे आणि दैवी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करण्याकडे ढकलली जाते.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना अचिंत कौर म्हणते, “मी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांपैकी दिती ही खूप दमदार आणि भावनिक गुंतागुंत असलेली व्यक्तिरेखा आहे. ती उग्र, बुद्धिमान आहे आणि वेदनेने प्रेरित आहे. पण त्या प्रचंड ताकदीच्या मागे एक माता आहे, जिने आतोनात नुकसान सोसले आहे. दितीच्या व्यक्तिरेखेतील द्वैत मला फार आवडले. आपल्या जगात ती संगोपन करणारी आहे आणि विनाश करणारीही आहे. त्यामुळे ती शिव पुत्र कार्तिकेयासाठी एक भयंकर खलनायिका बनते. तिच्यातील भावनिक आणि नैतिक लढा दाखवणे आव्हानात्मक आहे पण मी त्याचा आनंद घेतला आहे. ‘गणेश कार्तिकेय’ ही केवळ देव आणि दानवांची कहाणी नाही, तर कुटुंब, भावना आणि आपल्या नियतीला घडवणारे आपले निर्णय यांचीही कहाणी आहे.”