२१ ऑगस्टला रंगणार ‘मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’चा महाअंतिम सोहळा गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना त्यांचं टॅलेण्ट सिद्ध करता यावं यासाठी हक्काचा मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा. वयाचं बंधन नसल्यामुळे अगदी ४ वर्षाच्या चिमुरड्यापासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली. …