
no images were found
सोनी सबवरील प्रेक्षकांचा लाडका ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’मधील सद्दाम
प्रेक्षकांना दररोज रोमांच व मनोरंजनाचा आनंद देणारी सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’सुरू झाल्याच्या एक महिन्याच्या आत प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये रोमांचक पात्रासह प्रेक्षक सद्दामची भूमिका साकारणारा चंदन आनंदचे विनोदीशैलीसह खलनायकी पार्श्वभूमीसाठी, तसेच भूमिकेमधील दुष्टता उत्तमरित्या सादर करण्यासाठी कौतुक करत आहेत.
सुल्तानचा भाऊ सद्दाम व सिमसिम काबुल शाहीवर वर्चस्व स्थापित करतात. साम्राज्यावर राज्य करण्याच्या लोभासह तो मरियमच्या वडिलांचा खून करतो आणि सुल्तान म्हणून विराजमान होतो. सिमसिम त्याला मरियमला तिच्या हवाली केल्यास शक्ती देण्याचे वचन देते. अजिंक्य सम्राट बनण्याची ईर्ष्या असलेल्या त्याच्या विनोदी संवादामध्ये देखील क्रूर हेतू सामावलेले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांसाठी ही भूमिका पाहण्याकरिता अत्यंत रोमांचक आहे.