
no images were found
आज महाराष्ट्र सीईटी PCM आणि PCBचा निकाल
महाराष्ट्र सीईटी परीक्षा PCM आणि PCBचा निकाल आज १५ सप्टेंबरला जाहिर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रांस टेस्ट सेलकडून एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येईल. हा निकाल परीक्षार्थींना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर बघता येईल. हा निकाल सायंकाळी पाच वाजता घोषित करण्यात येणार आहे.
एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षा ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पूर्ण झाली तर एमएचटी सीईटी पीसीबी परीक्षा १२ ते २० ऑगस्टदरम्यान पार पडली. या परीक्षेचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर बघता येईल. या वेबसाईटवर निकाल पहावयास मिळेल :- cetcell.mahacet.org
MHT CET PCB आणि PCM चा निकाल असा पाहा- १) आधी mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, यानंतर तुमच्यापुढे होमपेज येईल २) होमपेजवरील स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा, ३) आता लॉग इन करा… तुमचा निकाल तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.
या निकालावरच विद्यार्थ्यांच्या पुढील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश निश्चिती अवलंबून असते. निकाल लागताच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात होईल.