Home शासकीय पणजी येथे ५२ वी डाक अदालत

पणजी येथे ५२ वी डाक अदालत

0 second read
0
0
108

no images were found

पणजी येथे ५२ वी डाक अदालत

कोल्हापूर: दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन पणजी यांच्या कार्यालयामध्ये 52 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली.
गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/ मनीऑर्डर/ बचत खाते/ प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अदालतीचे सेक्रेटरी यु. विजय कुमार, सहायक निदेशक डाक सेवा आणि सचिव, डाक अदालत, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 22 ऑक्टोबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…