
no images were found
डाक विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर : भारतीय डाक विभागाच्यावतीने या वर्षी दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जागृती आठवडा’ साजरा केला जाणार आहे. दक्षता जागृती आठवडा निमित्त “भ्रष्टाचार मुक्त भारत – विकसित भारत” या विषयावर निबंधलेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषणांसह वॉल पेंटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धकांनी आपले निबंध, चित्र सर्व तपशीलासह (उदा. नाव, इयत्ता,मोबाईल क्रमांक इ.) अधीक्षक डाकघर, कोल्हापूर डाक विभाग, कोल्हापूर यांच्या नावे 31 ऑक्टोबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने रजिस्टर पोस्टाने पाठवावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे.
स्पर्धेचे गट खालील प्रमाणे :-
निबंधलेखन स्पर्धा – 5 वी ते 10 वी ( विषय: भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत)
चित्रकला स्पर्धा: 5 वी ते 10 वी ( विषय: भ्रष्टाचार थांबवा)
घोषणासह वॉल पेंटिंग (स्थळ- कोल्हापूर मुख्य डाकघर इमारत, रमणळा, कोल्हापूर) – खुला गट
(पेंटिंगसाठी आपले रंग व इतर साहित्य आणायचे आहेत.)
या स्पर्धा अधीक्षक डाकघर, कोल्हापूर डाक विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहेत, असेही श्री. इंगळे यांनी कळविले आहे.