no images were found
कोल्हापूर रोटरी क्लबने १० क्षयरुग्णांना ६ महिन्यासाठी घेतले दत्तक
कोल्हापूर : रोटरी क्लबच्यावतीने शहरातील १० क्षयरुग्णांना ६ महिन्यांकरीता दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे. याचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे झाला.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वकांक्षी धोरण ठरविले आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी २०२५ पर्यंत राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. मायक्रोबॅक्टीरियम ट्युबरक्युलॉसिस या जंतुने माणसाच्या शरिरामध्ये प्रवेश केल्यामुळे क्षयरोग हा आजार होतो. या जंतुला मारणेसाठी रुग्णास 6 ते 8 महिने इतक्या जास्त कालवधीचा औषधोपचार घ्यावा लागतो.
रोटरी क्लबने शहरातील 10 क्षयरुग्णांना 6 महिन्यांसाठी दत्तक घेतले.
यावेळी आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांनी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची सखोल माहिती डेवून उपक्रमामध्ये सहभागी क्षयरोग निर्मुलन करण्याचे दृष्टीने प्रयत्न करावेत असे उपस्थितांना आवाहन केले.दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरीचे डिस्ट्रीक गव्हर्नर (डी.जी) व्यंकटेश देशपांडे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी संसर्गजन्य रोगांमध्ये सेवा बजावीत असलेबाबत कौतुक करुन रोटरी क्लब क्षयरोग या संसर्गजन्य आजाराप्रती संवेदनशिल असून या पुढील काळात सुध्दा क्षयरोग निर्मुलनाकरीता रोटरी क्लब कायम अग्रभागी राहील याची ग्वाही दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ.अमरसिंह पवार यांनी उपस्थित रोटरी क्लबचे पदाधिकारी यांनी प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत योजना यशस्वी करण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्था आणि दानशुर व्यक्ती यांच्यापर्यंत पोहचवुन क्षय मुक्त कोल्हापूर मोहिम यशस्वी करावी असे आवाहनही केले.
रोटरी क्लबचे धनंजय थोरात, राहुल काथरुट, डॉ.अभिजीत वज्रमुष्टी, दिपीन जाजु, प्रशांत मेहता व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्राचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली दळावी यांनी मानले.