Home क्राईम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक

1 second read
0
0
70

no images were found

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर वारंवार क्रिप्टोमधील इथेरियम प्रमोशनचे ट्वीट केले जात आहे. या प्रकारमुळे केडीएमसीमध्ये मोठी खळबळ उडाली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली असून केडीएमसीच्या ट्वीटर अकाऊंटचं नाव बदलून ते vitalik.eth असं करण्यात आलं असून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे अकाऊंट हॅक झाल्याचे समजते.

इथेरियम ब्लॉक चेनच्या प्रमोशनचे ट्वीट या अकाऊंट वरुन केले जात आहेत. या ट्वीटमध्ये एक लिंकही दिली आहे. इथेरियम ब्लॉकचे मर्ज होणार आहे. त्यामुळे हे प्रमोशन केले जात आहे. या ट्वीटमधील लिंकवर क्लिक करू नये, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. पालिकेकडून तातडीने ट्वीटर अकाऊंट पुन्हा एकदा रिक्व्हर करण्याचे काम सुरू आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…