Home मनोरंजन ‘घरवाली पेडवाली’मध्‍ये पारस अरोरा जीतूच्‍या भूमिकेत!

‘घरवाली पेडवाली’मध्‍ये पारस अरोरा जीतूच्‍या भूमिकेत!

1 min read
0
0
58

no images were found

‘घरवाली पेडवाली’मध्‍ये पारस अरोरा जीतूच्‍या भूमिकेत!

 

नाविन्‍यपूर्ण कथानकाचे मनोरंजन देण्‍याप्रती आपली कटिबद्धता कायम राखत एण्‍ड टीव्‍ही नवीन काल्‍पनिक मालिका ‘घरवाली पेडवाली’ लवकरच सुरू करणार आहे. पेनिन्‍सुला प्रोडक्‍शन्‍सद्वारे निर्मित या नवीन कौटुंबिक विनोदी मालिकेमध्‍ये विलक्षण अलौकिक शक्‍तीसंदर्भातील ट्विस्‍ट आहे, ज्‍यामधून हास्‍यपूर्ण, गोंधळयुक्‍त व हृदयस्‍पर्शी क्षणांचे मनोरंजन मिळेल. या मालिकेमध्‍ये प्रमुख पात्र आहे साधा-भोळा जीतू, ज्‍याचे जीवन वाटते तितके सामान्‍य नाही. त्‍याच्‍या दोन आई व दोन वडिल आहेत, त्‍याचे दोन बॉसेस् आहेत आणि नशीबातील विलक्षण बाब म्‍हणजे त्‍याच्‍या दोन पत्‍नी आहेत. जीतूची भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता पारस अरोराची निवड करण्‍यात आली आहे, जो या मालिकेसह विनोदी शैलीमध्‍ये पुनरागमन करत आहे. आपली भूमिका जीतूबाबत सांगताना पारस अरोरा म्‍हणाला, “मला जीतूबाबत रोचक वाटलेली बाब म्‍हणजे तो त्‍याची घरवाली व पेडवाली यांच्‍यामध्‍ये अडकला आहे, सतत दोन विश्‍वांमध्‍ये धावपळ करत आहे. तो सतत विलक्षण, विनोदी व अचंबित करणाऱ्या स्थितींमध्‍ये अडकतो. जीतूचे मालिकेमधील प्रत्‍येक पात्रासोबत वेगळे नाते आहे, ज्‍यामुळे त्‍याच्‍या व्‍यक्तिमत्त्वामधून विविध पैलू दिसून येतात. तो स्‍मार्ट किंवा तितकासा हुशार नाही, पण तो मनापासून काम करत जीवनावर नियंत्रण ठेवतो. त्‍याच्‍यामध्‍ये निरागसता आहे, जी या भूमिकेला अधिक प्रेमळ बनवते. जीतूची भूमिका साकारण्‍यामधील सर्वात मोठे आव्‍हान म्‍हणजे योग्‍य संतुलन राखणे, तो खूप हुशार किंवा खूप भोळा वाटू नये याची खात्री घेणे. या भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍याचा अनुभव अत्‍यंत समाधानकारक आहे, तसेच ही भूमिका माझ्यासाठी स्‍तरीय व अद्वितीय आहे.” 

      पारस या मालिकेसह विनोदी शैलीमध्‍ये परतण्‍यास उत्‍सुक आहे. तो पुढे म्‍हणाला, “आजच्‍या काळात विनोदी मालिका अत्‍यंत दुर्मिळ बनल्‍या आहेत आणि मला ही शैली साकारायला खूप आवडते. भारतीय टेलिव्हिजनवर नाट्य-आधारित मनोरंजन मोठ्या प्रमाणात आहे, पण आज काहीच मालिका प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करतात आणि मला तो सन्‍मान मिळाला आहे. मी विनोदी शैलीमध्‍ये काम करून खूप काळ उलटला आहे. मी पटकथा वाचली आणि संकल्‍पना समजली तेव्‍हा त्‍वरित जीतूमध्‍ये सामावून गेलो. मला ही भूमिका आवडण्‍यामागील कारण म्‍हणजे तो विनोदी, नम्र व भावूक आहे. माझे मालिकेच्‍या सांस्‍कृतिक पार्श्वभूमीने देखील लक्ष वेधून घेतले, जेथे मालिकेमधील बहुतांश पात्र उत्तर प्रदेशमधील आहेत, जे मालिकेमध्ये अधिक वास्‍तविकतेची भर करते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…