Home स्पोर्ट्स 11 व 16 वर्षाखालील शालेय  बुद्धिबळ स्पर्धा रविवारी कोल्हापुरात

11 व 16 वर्षाखालील शालेय  बुद्धिबळ स्पर्धा रविवारी कोल्हापुरात

9 second read
0
0
110

no images were found

11 व 16 वर्षाखालील शालेय  बुद्धिबळ स्पर्धा रविवारी कोल्हापुरात

कोल्हापूर (प्रतिनिधी) :-  चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब ने लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने दरवर्षी होणाऱ्या बुद्धिबळपटू व व्यासंगी कै.मंगेशराव कुलकर्णी स्मृतीप्रित्यर्थ  भव्य *पायोनियर चषक* अकरा व सोळा वर्षाखालील शालेय  बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक 27 जुलै रोजी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉल, पेटाळा , कोल्हापूर येथे आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा पायोनियर एनर्जी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरने प्रायोजित केल्या आहेत.

स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार अकरा व सोळा वर्षाखालील स्वतंत्र गटात या स्पर्धा होणार आहेत.

     पुणे,,बेळगाव, निपाणी,सोलापूर सांगली,सातारा,फलटण, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व स्थानिक जयसिंगपूर, इचलकरंजी व कोल्हापूर येथील नामवंत बुद्धिबळपटू ना आमंत्रित केले आहे..साधारण 200 ते 250 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होतील असा अंदाज आहे.. दोन्ही गटात मिळून रोख चाळीस हजार रुपयांची एकूण बक्षिसे व चषक आणि मेडल्स बक्षीस म्हणून ठेवले आहे. प्रत्येक गटातील स्पर्धा विजेत्यास रोख 3000 हजार रुपये व चषक,उपविजेत्यास रोख 2000 हजार रुपये चषक व तृतीय क्रमांकास रोख 1000 हजार रुपये चषक देऊन गौरविण्यात येणार आहे..

 प्रत्येक गटात मुख्य बक्षिसे 10 आहेत…त्याचबरोबर उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून उत्कृष्ट मुलींना व 7,9, 13 व 15 वर्षाखालील उत्कृष्ट मुलांना अशी एकूण बक्षिसे 78 बक्षिसे ठेवली आहेत.यामध्ये 18 चषक व 60 मेडल्स दिली जाणार आहेत. स्पर्धास्थळी सर्व स्पर्धकांसाठी दुपारी अल्पोपहारची व्यवस्था केली आहे.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी चारशे रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.

भाग घेऊ इच्छिणाऱ्या बुद्धिबळपटूनी आपली नावे प्रवेश फी सह आरती मोदी(8149740405) यांच्याकडे गुगल पे करून नोंदवावीत.

अधिक माहितीसाठी पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा..

1) मनिष मारुलकर- 9922965173 2)धीरज वैद्य – 9823127323, 3)आरती मोदी – 8149740405 4)उत्कर्ष लोमटे -9923058149 5)प्रीतम घोडके – 8208650388 6) रोहित पोळ :- 9657333926

असे स्पर्धा प्रमुख महेश कुलकर्णी,रो.वैभव सासुरकर, नितीन वाडिकर, मनिष मारुलकर,धीरज वैद्य व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी या पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव कोल्हापूर,(प्…