Home मनोरंजन आर्यनच्या हाताचं चुंबन घेण्यासाठी गर्दी !

आर्यनच्या हाताचं चुंबन घेण्यासाठी गर्दी !

0 second read
0
0
130

no images were found

आर्यनच्या हाताचं चुंबन घेण्यासाठी गर्दी !

मुंबई : किंग खान शाहरुख खान त्याच्या मुलाचं आर्यन खानचं नाव तितक्याच मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात त्याला झालेली अटक, प्रसिद्धी माध्यमांकडून त्या प्रकरणाला मिळालेलं कव्हरेज यामुळे आर्यन खान हा सर्वांना माहिती झाला. त्याचे सगळीकडे नावही झाले. चित्रपटात काम न करताच तो मोठा सेलिब्रेटी झाला आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा फॉलोअर्सही तयार झाला आहे. इंस्टावर त्याच्या नावाची चर्चा आहे. आर्यननं मैं हू ना स्टाईलमध्ये एक फोटोशुट केलं आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

शाहरुखचा लाडका आर्यन हा आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. चाहत्यांनी त्याच्या हाताचे चुंबन घेण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर  याप्रसंगाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकानं आर्यन खानला अटक केली होती. त्याच्यावरील कारवाई आणि तो तपास हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आर्यनला जी प्रसिद्धी मिळाली तेवढी त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी देखील मिळाली नसती अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

शाहरुखनं मात्र या साऱ्या परिस्थितीला धैर्यानं सामोरं जात आर्यनला दिलासा देण्याचे काम केले होते. आता शाहरुख – गौरी खानच्या आर्यननं मैं हू ना स्टाईलमध्ये एक फोटोशुट केलं आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…