no images were found
कुत्र्याची ऍलजी, सासू-सासरे ऐकेनात; नाराजीतून लेकीसह सुनेची आत्महत्या
बंगळुरू: सुनेला कुत्र्याची ऍलर्जी होती. त्यामुळे तिनं पती आणि सासू-सासऱ्यांना कुत्र्याला घरातून बाहेर काढण्यास सांगितलं. पण त्याला नकार दिल्याने बंगळुरूमध्ये सुनेने आपल्या मुलीसह आत्महत्या केली. महिलेची मुलगी खासगी शाळेत सहावीत शिकत होती.
एका महिलेला कुत्र्याची ऍलर्जी होती. त्यामुळे तिनं पती आणि सासू-सासऱ्यांना कुत्र्याला घरातून बाहेर काढण्यास सांगितलं. मात्र घरातील सदस्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे दुखावलेल्या महिलेनं तिच्या १३ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी ते शवविच्छेदनास पाठवले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पाळीव कुत्र्यावरून घरात वाद सुरू होता. त्यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती आणि सासू, सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
महिलेला श्वासाचा त्रास होता आणि डॉक्टरांनी तिला कुत्र्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. घरात कुत्रा नको, अशी विनवणी महिलेनं अनेकदा पती आणि सासू, सासऱ्यांकडे केली होती. मात्र कुटुंबीयांनी तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे घरात अनेकदा वाद व्हायचे. त्यामुळे अखेर टोकाचे पाऊल उचलले तिने आपल्या मुलीसह आत्महत्या केली.