no images were found
२३ सप्टेंबर रोजी ‘प्रीत अधुरी‘ प्रेक्षकांच्या भेटीसाठी!
कोल्हापूर – जवळपास गेल्या १५ वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दर्जेदार चित्रपट पाहिले. सगळ्या विषयांसोबतच काही हटके विषयदेखील चित्रपट रसिकांचं लक्ष आकर्षित करणारे ठरतात. अशीच एक हटके कथा घेऊन नवीन चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘प्रीत अधुरी’!
कुलस्वामिनी प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती स्वप्नाली पवार यांनी केली आहे. दिग्दर्शन प्रियांका यांनी केलं आहे. प्रवीण यशवंत आणि प्रीय दुबे या नव्या जोडीची भन्नाट केमिस्ट्री चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त संजय खापरे, मिलिंद दास्ताने, अरुण नलावडे, शमा निनावे आणि कमलेश सावंत यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिव ओंकार, प्रकाशमणी तिवारी, संदीप मिश्रा आणि महादेव साळोखे यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. शिव ओंकार आणि शशिकांत पवार यांनी लिहिलेल्या गीतांना कुणाल गांजावाला, जावेद अली, साधना सरगम, शाहीद माल्या, रितू पाठक, खुशबू जैन आणि सुदेश भोसले यांच्या स्वरांचा साज लाभला आहे. चित्रपटाचं कथानक जितकं इंटरेस्टिंग आहे, तितक्याच चित्रपटाशी संबंधित इतर काही बाबीदेखील या चित्रपटाचं वेगळेपण अधिक ठळक करणाऱ्या आहेत. चित्रपटात नायकाची भूमिका करणारा प्रवीण यशवंत हा एक अव्वल दर्जाचा डबिंग आर्टिस्ट आहे. आजपर्यंत हिंदी, मराठी, इंग्रजी, भोजपुरी आणि उर्दू अश तब्बल ५ भाषांमध्ये आपल्या आवाजाची जादू लोकांना दाखवणारा प्रवीण आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर त्याच्या अभिनयाचं कसब जगासमोर ठेवणार आहे. एवढंच नाही तर चित्रपटाचं दिग्दर्शन हे जिल्हा परिषद शाळेत पेशाने शिक्षिका असणाऱ्या प्रियांका यांनी केलं आहे.