Home मनोरंजन दुर्मिळ ‘चापडा’ साप आढळला राधानगरी धरणाजवळ

दुर्मिळ ‘चापडा’ साप आढळला राधानगरी धरणाजवळ

0 second read
0
0
61

no images were found

दुर्मिळ चापडासाप आढळला राधानगरी धरणाजवळ

राधानगरी : हा साप केवळ पूर्व आणि पश्चिम घाट परिसरामध्ये आढळतो. राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाशेजारी असलेल्या लोखंडी पाईपवर दुर्मिळ चापडा जातीचा विषारी साप धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकंच्या दृष्टीस पडला. एक तासानंतर हा साप धरणाशेजारील जंगल क्षेत्रात गेला. घोणस, फुरसे यांपैकी असलेला ‘चापडा’ हिरवा घोणस म्हणूनही ओळखला जातो. इंग्रजीमध्ये याला ‘बांबू पिट व्हायपर’ असेही म्हणतात. हा साप तसे रागीट, चिडखोर तसेच अत्यंत आक्रमक आणि चपळ असतो. तो जंगले आणि डोंगराळ भागात लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर राहतो. बाबूंच्या वनात हा साप हमखास पाहायला मिळतो. पोपटी, हिरवा, शेवाळी, हिरवट पिवळा रंगामध्ये याची संपूर्ण पाठ असते. तर पोटाकडचा भाग पिवळ्या रंगाचा असतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी कोल्हापूर, : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्य…