Home मनोरंजन अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार ‘आर यु ब्लाइंड?’

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार ‘आर यु ब्लाइंड?’

0 second read
0
0
239

no images were found

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार आर यु ब्लाइंड?’

मराठी रंगभूमीला आशयघन नाटकांची थोर परंपरा लाभली आहे. नाटक हे अभिव्यतीच उत्तम माध्यम म्हणून अनेक नाटककार नाटकाकडे पाहत असतात. अनेक नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडत असतात. समाजात वैचारिक क्रांती घडवणाऱ्या या नाटकांच्या यादीत आता आणखी एका नाटकाची भर पडणार आहे. ‘आर यु ब्लाइंड?’ असा सवाल करत एक नवं कोर नाटक मराठी  पुण्यातल्या यशस्वी प्रयोगानंतर १६ सप्टेंबर सायं. ७.०० वा. केशवराव भोसले नाटय़गृह, कोल्हापूर. १७ सप्टेंबर, दुपारी ४.३० वा. भावे नाट्य मंदीर, सांगली तर १८ सप्टेंबर सायंकाळी ७.०० वाजता शाहू कला मंदिर, सातारा येथे ‘आर यु ब्लाइंड?’चे प्रयोग होणार आहेत.

चार्ली स्टुडिओ निर्मित आणि मिलाप प्रस्तुत ‘आर यु ब्लाइंड?’  विशाल कदम यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे नाटक समाज कसा विघातक होत चाललाय, दिशाहीन बनत चालला आहे, आपण या देशाचे उत्तम नागरिक होण्यापेक्षा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होऊन आपलच कस नुकसान करत आहोत, सगळ्याच धर्मांचा धार्मिक उन्माद, विचारवंतांच्या हत्या हे सगळ आपल्याला कुठे घेऊन निघालय, यावर हे नाटक सडेतोड भाष्य करताना दिसते. या नाटकाचं दिग्दर्शन  विक्रम-प्रणव या जोडगोळीने केलं आहे. डॉ. रमेश खाडे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. विक्रम पाटील, प्रणव जोशी आणि सागर पवार हे कलाकार नाटकात मुख्य भूमिका साकारत आहेत. नेपथ्य देवाशीष भरवडे यांनी केलं असून, संगीत संकेत पाटील यांनी दिलं आहे. श्याम चव्हाण यांनी प्रकाश योजना केली आहे आणि नाटकाचे पोस्टर कनक चव्हाण यांनी केले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…