no images were found
संपमधील गाळ काढणेचे कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील चार सेटलिंक टँकमधील गाळ काढण्यात नुकताच काढण्यात आला आहे. येथील उर्वरित क्लॅरिफ्लॉकीलेटर टँकमधील व प्युअरवॉटर संपमधील गाळ काढणे आवश्यक असून हे काम गुरुवार दिनांक. 17 ऑगस्ट 2023 रोजी हाती घेण्यात येणार आहे. हा गाळ काढण्याकरीता किमान एक दिवसांचा कालावधी लागणार असलेमुळे गुरुवार दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी नागरीकांना दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच शुक्रवार दि.18 ऑगस्ट 2023 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.
यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजे संभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, तुळजा भवानी कॉलनी, देवकर पाणंद, हरीओमनगर, रंकाळा परिसर, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दाररोड, मंगळवार पेठ काही भाग तसेच सी डी वॉर्ड मधील दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदीर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी, देवल क्लब परिसर ई वॉर्ड मधील खानविलकर पेट्रोल पंप, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागातील नागरीकांना पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.