
no images were found
भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नागाळा पार्क येथील नूतन कार्यालायत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत सकाळी ठीक 8 : 30 वाजता माजी सैनिक देवदास अवताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत होऊन सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, अशोक देसाई, सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख कार्यामुळे भारत देशाची ख्याती वाढली असून दूरदृष्टी, विकासकामांचा धडाका, सर्वसामान्य घटकांना न्याय हा त्यांच्या ‘सब का साथ- सब का विकास’ या घोषणेतून सत्यात उतरताना दिसत आहे. त्यांच्या अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूरचे वैभव टिकवून ठेवत अनेक वर्षे रखडलेल्या विषयांना गती मिळत असल्याचे नमूद केले. कोल्हापूरचा विविध मार्गाने होणारा विकास त्यांनी बोलून दाखविला. त्याचबरोबर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या या भव्य कार्यालयाच्या राष्ट्रध्वज ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहत असल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचे नमूद केले.
भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मेरी माटी मेरा देश या योजनेची माहिती व अमृत भारत वृक्षवटिका याची माहिती दिली व मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा सुरू असणारा चौफेर आढावा त्यांनी घेतला. देशाची आर्थिक प्रगती संरक्षण क्षेत्रातील स्वयं सिद्धता व अंतरिक्ष मध्ये सुरू असणारी प्रगती असे अनेक देशहिताचे निर्णय मोदीजींच्या विकासाभिमुख विचारांमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये जिलेबीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, राजू मोरे, संजय सावंत, अमोल पालोजी, विजय आगरवाल, सुनीलसिंह चव्हाण, विजयसिंह खाडे, गायत्री राऊत, प्रदीप उलपे, संपतराव पवार, डॉ राजवर्धन, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, रमेश दिवेकर, गिरीश साळुंखे, रवींद्र मूतगी, सुभाष रामुगडे, संदीप कुंभार, समीर येवलुजे, धीरज उलपे, विशाल शिराळकर, अनिल पाटील, रहीम सनदी, योगेश साळुंखे, मानसिंग पाटील, महादेव बिरंजे, दत्ता लोखंडे, महेश यादव, राजाराम परीट, अरविंद वडगावकर, किशोर लाड, रावसाहेब शिंदे, सतीश अंबर्डेकर, अनिकेत सोलापुरे, बालाजी चौगुले, विवेक वोरा, रोहित कारंडे, हर्षांक हारळीकर, कार्तिक देशपांडे, नजीर देसाई, सुषमा गर्दे, सुनिता सूर्यवंशी, शुभांगी चितारे, विद्या पाटील, विद्या बागडी, विद्या बनछोड़े, समयश्री अय्यर ई. पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृपया प्रसिद्धीसाठी,