no images were found
शरद पवारांना भाजपसोबत आणलंत तरच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल,विजय वडेट्टीवारांचा दावा
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त बैठकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली होती.
अशातच आता विजय वडेट्टीवारांनी शरद पवार-अजित पवार भेटीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ते दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार काका-पुतण्या आहेत. परंतु, विजय वडेट्टीवार यांनी तुर्तास आमच्या मनात शरद पवार यांच्याविषयी संभ्रम नसल्याचे म्हटले. त्यांना आणखी थोडा वेळ द्यायला हवा. मी या भेटीने संभ्रम निर्माण झाला असं म्हणणार नाही.
या भेटीत कुणाची तरी गरज आहे. ही गरज जो भेटायला जातो त्याचीच आहे.अजित पवार यांना शरद पवार यांची गरज आहे. त्यामुळे अजित पवार हे शरद पवार यांना भेटायला जात आहेत. शरद पवारांना भाजपसोबत युती करण्यास राजी करता आले नाही तर अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अपूर्ण राहील, अशी अट भाजपकडून घालण्यात आली असावी. हा सगळा सत्ता टिकवण्यासाठीचा खटाटोप असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.