no images were found
ऑनलाइन पेमेंटमुळे कंडक्टरांचा त्रास होणार कमी
आता नवीन कंपनीच्या माध्यमातून एसटीच्या कंडक्टरांना नवीन अँड्रॉइड तिकिट मशिन देण्यात येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात एकूण २०० मशिन पाठविण्यात आली आहेत. यातील दोन दिवसांत चार मशिन संबंधित कंडक्टरांना देण्यात आली आहेत. या नवीन मशिनच्या माध्यमातून आता एसटी कर्मचाऱ्यांना बॅटरीचाही त्रास कमी होणार. याशिवाय आगामी काही दिवसांत या मशिनवर ऑनलाइन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा चिल्लरचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटीच्या पथकाने तिकीट तपासणी दरम्यान एसटी कर्मचाऱ्याकडे चिल्लर जास्त आढळल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अनेक प्रसंग झालेले आहे. आता ऑनलाइन पेमेंटचा अनेक जण वापर करीत असतात. यामुळे ऑनलाइन पेमेंटमुळे चिल्लरची कटकट कमी होणार असल्याची माहिती एसटीच्या कंडक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या अँड्रॉइड तिकिट मशिनचा प्रयोग शहर बस सेवेत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कडून करण्यात आला आहे. या मशिनचा वापर करणाऱ्यांना ही मशिन सोपी झालेली आहे. मोबाइलप्रमाणे हे मशिन असल्यामुळे याचा चांगला वापर होत आहे, अशीही माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.