सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव करणार सूत्रसंचालन दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी स्टार प्रवाह वाहिनी १० सप्टेंबरपासून भेटीला घेऊन येतेय असाच एक भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’. नावाप्रमाणे हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा धिंगाणा असणार आहे. स्टार प्रवाहचा हा नवा कोरा कार्यक्रम म्हणजे अंताक्षरीचा भन्नाट प्रयोग म्हणता येईल. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या या नव्या …